मेघा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.महाराष्ट्र, महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे.संजय राऊत यांना न्यायालयाने 15 दिवसांच्या कारावासाची आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती, डॉ. मेधा किरीट सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी दिली आहे.
*100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप*
मीरा-भाईंदर येथे शौचालय बांधकाम प्रकरणी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी आरोप केले होते. या प्रकरणी 2022 मध्ये राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांशी संबंधीत संस्थेने 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचे आरोप केले होते.या नंतर डॉ. मेघा किरीट सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेत संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. तो दावा आता निकाली निघाला असून, त्यानंतर राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
