सर्वांना धक्का देत इराणने (Iran) इस्रायल (Israeli) मोठा मिसाईल हल्ला केल्याने जगात एका नवीन युद्धाला सुरुवात झाली आहे. इराणने 01 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 200 पेक्षा जास्त मिसाईल डागून सर्वांना धक्का दिला तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.या बातमीनुसार आता लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहने (Hezbollah) इस्रायली कॅप्टनसह आठ सैनिकांना ठार केले आहे. इस्रायली लष्करानेही आपल्या सैनिकांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. बॉम्ब हल्ल्यात आठ सैनिकांना मृत्यू झाला असल्याची माहिती इस्रायलकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे हिजबुल्लाने आपल्या लष्करी रणनीतीने इस्रायली सैनिकांचा पराभव केला असल्याचा दावा केला आहे. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन इटान इत्झाक ओस्टर बुधवारी हिजबुल्ला विरुद्ध लढताना मारले गेले मात्र इस्रायलकडून याबाबत अधिक तपशील देण्यात आलेली नाही. दोन दिवसापूर्वी इस्रायलने हिजबुल्लाह विरुद्ध जमिनीवर युद्ध करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर इस्रायली सैनिक लेबनॉनमध्ये दाखल झाले होते.
