बीड l सांजसुयोग वार्ता :
नाथ हायस्कूल नाथापूर ची विद्यार्थीनी शेख अर्शीया शफ्फार याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत 98.00% टक्के गुण मिळवून शाळेचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने हे यश मिळवले आहे. शेख अर्शीया शफ्फार यांच्या यशामुळे कुटुंबात आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्याचे गावातील नागरिक, शिक्षकवर्ग,पालक आणि परिवार कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
