बीड दि. २६ मे : मागील दोन तीन दिवसांपासून अखंड संततधार सुरु असलेल्या पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून जुने पूल पाण्याखाली गेले आहेत.
संततधार पावसाच्या हाहाकारामुळे अनेक ठिकाणी शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मॉन्सून पूर्व वरुण राजाच्या जोरदार हजेरीने बीड तालुक्याची बिंदुसरा नदीला पूर आला आहे.
